राहुल गांधींची आरक्षणावर दुटप्पी भूमिका – अंकुश जाधव

5 ऑक्टोबर च्या आरक्षण रॅलीची नियोजन बैठक वैभववाडीत संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी) : कोणाच्याही बापजाद्याने आम्हाला आरक्षण दिलेले नाही. त्यामुळे ते कोणीही रद्द करू शकत नाही. आरक्षण आमच्या हक्काचं आहे. ते कोणाच्याही बापाचं नाही. आरक्षण संपविणार या राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. राहुन राहुन हुल देणारे म्हणजे राहुल गांधी. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा समाजातील प्रत्येक घराघरात जाऊन धिक्कार करणार अशी टीका अंकुश जाधव यांनी वैभववाडी येथे पत्रकार परिषदेत केली.

5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आरक्षण बचाव रॅलीच्या नियोजनाची बैठक वैभववाडी येथील भाजपा कार्यालयात पार पडली. यावेळी नामदेव जाधव, भाजपा महिला जिल्हा सरचिटणीस शारदा कांबळे, वैभववाडी मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, नासीर काझी, भालचंद्र साठे, प्राची तावडे, नेहा माईणकर, संजय सावंत, आर्या कांबळे, अभय कांबळे उपस्थित होते.

5 ऑक्टोबरची आरक्षण बचाव रॅली ही आमदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार व अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. राहुल गांधींनी आरक्षण संपवा असे धक्कादायक वक्तव्य केले. तर लोकसभेत त्यांनी संविधान बचाव असा प्रचार केला होता. त्यांची ही  दुटप्पी भूमिका आता जनतेला समजली आहे. आरक्षणामुळे अनेक युवकांना नोकऱ्यांमध्ये संधी मिळाली. आमच्यासारख्या युवकांना राजकारणांत संधी मिळाली. समाजात समान दर्जा आरक्षणामुळे प्राप्त झाला. त्यामुळे ते कोणीही रद्द करू शकत नाही. पार पडणाऱ्या रॅलीतील सभेत अजूनही काँग्रेस पक्ष व राहुल गांधींच्या वक्तव्याची चिरफाड करणार असे जाधव यांनी सांगितले. भाजपवर जातीयवादीचे आरोप करणारे राहुल गांधी यांचाच पक्ष जातीवादी आहे. 60 वर्षात संविधानाची तोडफोड करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. मुंबईत इंदु मिलची जागा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच मिळाली आहे. काँग्रेस पक्षाला सा
60 वर्षात ते जमले नाही अशी टीका जाधव यांनी केली.

यावेळी शारदा कांबळे यांनी देखील राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. नामदेव जाधव म्हणाले, भाजपने गांधींच्या वक्तव्याचा कडाडून विरोध केला आहे. त्यांनी हे विधान भारतात केले असते तर इतका विपर्यास झाला नसता. परंतु परदेशात जाऊन त्यांनी हे बेताल वक्तव्य केलं आहे. ज्यांना आरक्षण मिळतं त्यांनी या वक्तव्याचा विरोध केलाच पाहिजे. एससी, एसटी, एनटी, धनगर समाज, ओबीसी समाज यांनीही या रॅलीत सहभागी व्हावे असे जाधव यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!