आमदार नितेश राणेंच्या हस्ते रेल्वे स्टेशनमार्ग सुशोभीकरणाचे 2 ऑक्टोबर रोजी होणार लोकार्पण

स्कल्पचर द्वारे सुशोभीकरण करत सामाजिक संदेश

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील श्रीधर नाईक चौक ते रेल्वे स्टेशनपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दुभाजकाचे सुशोभीकरण करण्याचे काम कणकवली नगरपंचायतीने हाती घेतले आहे. नागरी स्थानिक संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी या योजनेतून रेल्वे स्टेशन मार्गावरील दुभाजकांवर विशिष्ट प्रकारचे स्कल्पचर उभारण्यात येणार आहेत. हे काम पूर्ण झाल्यावर लवकरच या कामाचे लोकार्पण केले जाणार आहे. यामुळे कणकवली शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. कणकवली शहर हे पर्यटनदृष्ट्या विकसित होत आहे. विमानतळासारखे वाटणारे कणकवली रेल्वे स्टेशनचे कामपूर्ण झाले असून शहरातील गणपती साना येथील धबधबा, सुशोभीकरण केलेला क्रीडा संकुलचा परिसर आणि आता नरवडे रेल्वे स्टेशन मार्गावर होणारे स्कल्पचर कणकवलीच्या पर्यटनाला चालना देणारे ठरेल. यामध्ये माझी वसुंधरा, विविध प्रकारची योगासने, सेव्ह द चाईल्ड, सेव्ह अर्थ, डॉक्टर, स्वच्छतेचा संदेश अशा प्रकारची स्कल्पचर बसविण्यात येत आहेत. सदरच्या स्कल्पचरच्या माध्यमातून नागरिकांना विविध सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न नगरपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. अशा प्रकारची एक ना अनेक विकासकामे व सुशोभीकरण यामुळे कणकवली शहर हे पर्यटनाचे केंद्रबिंदू बनत चालले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!