प.पू.भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था खारेपाटण ची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

खारेपाटण पतसंस्था प्रगतीकडे वाटचाल करणारी संस्था – नासीरभाई काझी

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावात गेली ३४ वर्षे कार्यरत असलेली  प.पू.भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खारेपाटण या सहकारी संस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.२९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता संस्थेचे अध्यक्ष नासीरभाई काझी यांच्या अध्यक्षतेखाली खारेपाटण हायस्कूल च्या कै.चंद्रकांत परिसा रायाबागकर सभागृहात संपन्न झाली.     

या ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र ब्रम्हदंडे, संचालक प्रवीण लोकरे, संतोष पाटणकर, संचालिका श्रद्धा देसाई,संचालक कुडतरकर,संतोष हरयान. नंदकिशोर कोरगावकर, परवेज पटेल, राजेंद्र वरुणकर,संचालिका मनस्वी कोळसुलकर,तज्ञ संचालक भावेश कर्ले आदी संस्थाचालक उपस्थित होते.तर या सभेला खारेपाटण उपसरपंच महेंद्र गुरव तसेच खारेपाटण गट विकास सेवा सोसायटीचे चेअरमन रवींद्र जठार,व्हॉईस चेअरमन सुरेंद्र कोरगावकर,आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी प.पू भालचंद्र महाराज यांच्या प्रतिमेला संस्था अध्यक्ष नासीर भाई काझी यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून वार्षिक सर्व साधारण सभेला सुरवात  करण्यात आली.संस्थेचे कार्यलक्षी संचालक तथा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम मोरे यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करून ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे सूत्रसंचालन केले.यावेळी संस्थेच्या वतीने खारेपाटण येथील समर्थ महिला बचत गटाच्या प्रतिनिधी जागृती जनार्दन पोटले यांची दिल्ली येथील वर्ल्ड फूड इंडिया प्रदर्शनात निवड झाल्याबद्दल त्यांचा संस्थेच्या संचालिका श्रद्धा देसाई यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तर खारेपाटण विभातील कुरांगवणे या गावातील युवक ओम उन्हाळकर याने नेपाळ पोखरा येथे पार पडलेल्या ३००० मिटर धावणे क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत देशाला सुवर्ण पदक प्राप्त करून दिल्याबद्दल त्यांच्या मातोश्री उन्हाळकर यांचा संस्थेच्या वतीने संचालिका मनस्वी कोळसुलकर यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याबरोबरच खारेपाटण गट विकास सर्व सोसायटीचे सचिव अतुल कर्ले याना सहकार शेत्रातील उत्कृष्ट कर्मचारी म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने संस्था अध्यक्ष नासीरभाई काझी यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

संस्थेचे सचिव शुभम मोरे यांनी वार्षिक सभेत संस्थेच्या वार्षिक अहवाल काळातील चढता आलेख ताळेबंद,जमाखर्च नफातोटे पत्रक व प्रगतीचा अहवाल सभासदापुढे सादर केला.” संस्थेच्या प्रगतीत सभासद ठेवीदार व कर्जदार यांचा सिंहांचा वाटा असून आपल्या सर्वांच्या सहकार्याने संस्थेने आपले कार्यशेत्र वाढवूनआता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा असे केले आहे. तर लवकरच संस्थेच्या कणकवली येथील नवीन शाखेचे उद्घघाटन  करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी संस्था अध्यक्ष नासीर काझी यांनी दिली.शेवटी सर्वांचे आभार मानून राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!