कसवण ग्रा.पं आयोजित  आरोग्य शिबिरात 41 जणांची मोफत आरोग्य तपासणी 

कणकवली (प्रतिनिधी) : कसवण- तळवडे ग्रामपंचायत आणि ऍड. दत्ता पाटील होमिओपॅथी मेडिकल कॉलेज वेंगुर्ले यांच्या विद्यमाने कसवणतळवडे ग्रामपंचायत सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या  आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर पर्यंत सेवामाह कार्यक्रमांमध्ये 30 सप्टेंबर रोजी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते

सदर शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून रोगनिदान केले तसेच रक्त व ई सी जी तपासणी देखील करण्यात आली यावेळी लोकनेते ऍड दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल वेंगुर्ला यांचे कडील डॉक्टर पूजा करपे जिल्हा समन्वय अधिकारी डॉक्टर मानसी सातार्डेकर डॉ. संगीता मुळे कणकवली पॅथॉलॉजी सेंटरचे सोनिया तेली इत्यादी उपस्थित होते या शिबिरांमध्ये एकूण 41 लोकांनी लाभ घेतला असून 17 लोकांच्या रक्त तपासण्या 10 लोकांचे ईसीजी विनामूल्य पद्धतीने करण्यात आल्या तसेच 41 व्यक्तींना विनामूल्य औषधोपचार करण्यात आला याप्रसंगी ग्रामपंचायत कसवण-तळवडे चे सरपंच मिलिंद सर्पे उपसरपंच गोपीनाथ सावंत डॉ. मानसी सातार्डेकर डॉ. संगीता मुळे, सुखदा सावंत, एलिना मेंडीस, राजा रेडकर, नाडकर्णी, वाज, पांढरे, तानावडे कसवण उपकेंद्राचे आरोग्य सेवक प्रीतम सावंत कसवण आशा सेविका स्नेहा तांबे तळवडे आशा सेविका संचिता राऊळ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते सदर कार्यक्रम ग्रामपंचायत कासवण तळवडे कार्यक्षेत्रात राबवले बाबत ग्रामसेवक आचरेकर यांनी सर्वांचे आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!