सन 2021 सालातील भात पिक स्पर्धेत आला होता राज्यात दुसरा क्रमांक
भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांनी केले अभिनंदन
आचरा (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा जिल्हासरचिटणीस, वैभववाडी मांगवली गावाचे सुपुत्र, समाजसेवक, प्रगतीशील शेतकरी, शिक्षणतज्ज्ञ, कोंकण विद्या प्रसारक मंडळ मुंबईचे उपाध्यक्ष महेश संसारे यांचा सन 2021 सालातील भात पिक स्पर्धेत राज्यात दुसरा क्रमांक आला होता. 2022 मध्ये पुरस्कार जाहीर झाला होता. त्या बद्दल महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन ह्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. महेश संसारे यांचा राज्यपालाच्या हस्ते पुरस्कार देवून गौरव झाला त्या बद्दल भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांनी त्यांचे किसान मोर्च्याच्या वतीने अभिनंदन केले आहे.