पत्रकार गिरीश परब यांच्या संकल्पनेतून रेडियम बेल्टचे वितरण
कणकवली (प्रतिनिधी) : महामार्गावर अचानक जनावरे आडवी आल्याने होणारे अपघात टाळण्यासाठी पत्रकार गिरीश परब यांच्या संकल्पनेतून अनोखी संकल्पना राबविण्यात आली आहे. वागदे ग्रामपंचायतचे सहकार्य घेऊन मुंबई – गोवा महामार्गालगत असलेल्या जनावरांना रेडीयम बेल्टचे वाटप करण्यात आले. जेणेकरून हायवेवरून जाताना वाहन चालकांना लांबूनच रेडीयम दिसेल आणि अपघात टाळण्यासाठी त्याची मदत होईल.
वागदे गावातील शेतकऱ्यांकडून वागदे ग्रामपंचायतने राबविलेल्या अपघात रोखण्यासाठीच्या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
यावेळी येथील संदीप सावंत, श्रीधर घाडीगावकर, ग्रामसेवक युवराज बोराडे, दीपक कदम, सुनील गोसावी आदि वागदे गावातील शेतकरी उपस्थित होते.