मेजर कौस्तुभ राणे यांच्या शौर्यातुन प्रेरणा घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या देशाप्रती अभिमान बाळगावा- विजय रावराणे
वैभववाडी (प्रतिनिधी) : गुरेज सेक्टर मध्ये झालेल्या दहशतवादी हल्यात शहिद झालेले वैभववाडी सडुरे गावचे सुपुत्र हुतात्मा मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांच्या ६ व्या स्मृतिदिनानिमित्त वैभववाडीत तालुकास्तरीय निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दि.७ ऑगस्ट २०२४ रोजी या स्पर्धा इयत्ता – पाचवी ते आठवी व नववी ते बारावी अशा दोन गटात घेण्यात आल्या या लहान गटात वैष्णवी हावळ हीने प्रथम क्रमांक, दुर्वाक्षी फाटक हिने द्वितीय क्रमांक तर प्रांजल हत्तूरे हिने तृतीय क्रमांक पटकावला तसेच मोठ्या गटात साक्षी भोसले हिने प्रथम क्रमांक, शिवानी फुटक हिने द्वितीय क्रमांक तर प्राची तळेकर हिने तृतीय क्रमांक पटकावला याशिवाय चंदना गुरव व सिद्धी पाटील यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. या सर्व विजेत्या स्पर्धकांना हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांचे काका विजय रावराणे तसेच विठ्ठल रावराणे यांच्या सौजन्याने सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या शौर्यातुन प्रेरणा घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या देशाप्रती अभिमान बाळगावा असे मत विजय रावराणे यांनी यावेळी व्यक्त केले. तर शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शिक्षकांबरोबरच विद्यार्थी व पालक यांनी देखील विशेष लक्ष द्यावे असे आवाहन वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व्हि.एस.मरळकर, प्रास्ताविक पर्यवेक्षक एस.बी.शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन एन.व्ही.प्रभु यांनी केले. पारितोषिक वितरणाबरोबरच सराव चाचणी च्या निकालाचे वाचन करण्यात आले.
यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी.एस.नादकर हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांचे काका विजय रावराणे, वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे संचालक शरद नारकर, विजय रावराणे, माता पालक संघाच्या अध्यक्षा स्वराली कोलते, वैभववाडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तेजस आंबेकर, मायक्रो कम्प्युटर चे सचिन रावराणे प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.