सोसाट्याचा वादळी वारा विजांचा कडकडाटा सहित मुसळधार पावसाने नांदगाव दशक्रोशीस झोडपले

विद्युत पुरवठा अद्यापही खंडित

झाडे तसेच विद्युत पोल उन्मळून पडले

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नांदगाव दशक्रोशी परिसरामध्ये आज सायंकाळी पाच नंतर विजेच्या कडकडाट व वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत तर विद्युत पुरवठा अद्यापही खंडित आहे. नांदगाव आणि असलदे परिसरात विजेचे पोल व विद्युत लाईन वादळी वाऱ्यामुळे जमिनीवर पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. तसेच जोरदार वादळी वारा व प्रचंड विजेच्या कडकडाटाने 33 केवी लाईन बिघाड झाला असल्याचे संबंधित विभागाने सांगितले आहे. संबंधित विभागाचे युद्ध पातळीवर काम सुरू असून विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी अजून काही तास लागतील असे सांगितले आहे.

error: Content is protected !!