१९ वर्षाखालील जिल्हास्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत खारेपाटण ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला

खारेपाटण (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडाअधिकारी सिंधुदुर्ग व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये खारेपाटण येथील उद्योगश्री प्र. ल. पाटील ज्युनिअर कॉलेज खारेपाटण च्या १९ वर्षाखालील मुलांच्या संघाने लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशा बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

सदर संघाची आता विभाग स्तरासाठी निवड करण्यात आलेली आहे. याबरोबरच तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत कु.सानवी जामसंडेकर हिने ८०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक तर कु.वेदिका तावडे हिने ४०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.या दोन्ही विद्यार्थिनीची जिल्हास्तरावर निवड झालेली आहे. तसेच वैयक्तिक खेळांमध्ये कु.ऋतुजा गायकवाड या विद्यार्थिनीने उंच उडी या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक व अभिषेक पाटील या विद्यार्थ्याने उंच उडी या प्रकारात मुलांमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला.या स्पर्धेसाठी प्रशालेतील क्रीडा शिक्षक श्री.पाडवी व श्री. भिसे यांनी विशेष परिश्रम घेतले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे,उपाध्यक्ष भाऊ राणे, सेक्रेटरी महेश कोळसुलकर,सर्व संचालक मंडळ,प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सानप,पर्यवेक्षक संतोष राऊत,प्रशालेतील सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!