कणकवली तालुका व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष विशाल कामत भाजपात दाखल

आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश

कणकवली (प्रतिनिधी) : सामाजिक कार्यकर्ते कणकवली व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यापारी विशाल कामत यांनी आज आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. कणकवली येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात विशाल कामत यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपवासी झाल्याचे मत विशाल कामत यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, किशोर राणे, महेश सावंत, संजय कामतेकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक भाजपा शहराध्यक्ष यांना कोदे यांच्यासह अन्य उपस्थित होते.

error: Content is protected !!