माजी उपसरपंच दिनेश वारंग यांनी सहकाऱ्यांसह केली तातडीची आर्थिक मदत
कुडाळ (प्रतिनिधी) : शुक्रवार 11 ऑक्टोबर रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने घावनळे खुंटवळवाडी येथील अन्नपूर्णा वसंत म्हापणकर यांच्या घराचे मोठया प्रमाणात पत्रे उडाले व घराचे व घरातील वस्तूचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य दिनेश वारंग, मा. ग्रामपंचायत सदस्य योगेश पारकर, दिलीप पारकर, संदीप पारकर, नितीन परब, भाई बिले, पंढरी पारकर आणि खुंटवळवाडी ग्रामस्थांनी पाहणी केली व घरातील सदस्य यांना धीर दिला, दिनेश वारंग यांनी तात्काळ माजी खासदार निलेश राणे यांना फोन करत म्हापणकर कुटुंबियांच्या झालेल्या नुकसानीबाबत माहिती दिली. माजी खासदार निलेश राणे यांनीही म्हापणकर यांना आर्थिक सहकार्य करण्याच आश्वासन दिलं. तातडीची मदत म्हणून दिनेश वारंग व सहकारी यांनी 5000 रुपयाची तात्काळ आर्थिक मदत म्हापणकर यांना केली, तलाठी, ग्रामसेवक यांना तात्काळ मोबाईल वरून झालेल्या नुकसानीची माहिती देत पंचनामा करण्याबाबत अवगत केले. म्हापणकर कुटूंबातील सदस्य यांनी दिनेश वारंग व सहकारी यांचे आभार मानले.