वेंगुर्लेत भाजपा अनुसूचित जाती मोर्चाची तालुका कार्यकरणीची बैठक संपन्न

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्लेत भाजपा तालुका कार्यालयात अनुसूचित जाती मोर्चाची बैठक जिल्हा संयोजक नामदेव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी भाजपा वेंगुर्ले तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी जिल्हा संयोजक नामदेव जाधव यांचे व तालुका संयोजक बाळा मधुकर जाधव यांनी इतर सर्वांचे स्वागत केले. यावेळी मार्गदर्शन करताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी भाजपा मध्ये अनु. जाती मोर्चा हा महत्वाचा घटक असल्याचे सांगून, पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागास समाजातील घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबविण्यात आल्याचे सांगीतले. मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार हे निःपक्षपाती सरकार आहे, सर्वांच्या सक्षमीकरणासाठी आणि सामाजिक न्यायावर नव्याने लक्ष केंद्रित करणारी धोरणे आखली जात आहेत. संसदेच्या सेंट्रल हाॅलसमोर श्रद्धांजली अर्पण करणे असो कि संविधाना समोर नतमस्तक होणे, संविधान दिन साजरा करणे असो कि सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांचे प्रतिनिधित्व सक्षम करणे असो, सामाजिक न्याय हा मोदी सरकारने कृतीतून दाखवून दिला. २०१५ च्या आधी ” २६ नोव्हेंबर ” हा कायदा दिवस म्हणुन ओळखला जात होता. मोदी सरकार ने हा दिवस ” संविधान दिन ” म्हणून साजरा करायला सुरुवात केली. योगायोगाने हा निर्णय डाॅ. आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती वर्षांत घेण्यात आला. संविधान दिन हा सर्व नागरिकांना विनम्र पणे आठवण करुन देतो कि, त्यांनी केवळ संविधान वाचलेच नाही तर ते आचरणात आणले पाहिजे. या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी भारत सरकार आणि पंतप्रधान मोदींचे कौतुक केले पाहिजेत.

यावेळी भाजप जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव व कणकवली विधानसभा संयोजक संतोष जाधव यांनी मार्गदर्शन केले. तसेच अनुसूचित जाती मोर्चा शहर अध्यक्ष पदी युवराज जाधव व महीला शहर अध्यक्ष पदी विशाखा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच तालुका उपाध्यक्ष पदी मधु नारायण माडकर (आरवली) यांची निवड करण्यात आली. यावेळी भाजपा ता. सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर, जि.का.का.सदस्य वसंत तांडेल, अणसुर सरपंच सत्यविजय गावडे, अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हा महीला संयोजीका मठकर, जिल्हा सरचिटणीस गुरुप्रसाद चव्हाण, जि. कोषाध्यक्ष अनंत आसोलकर, सावंतवाडी विधा. संघटक महेश गणपत चव्हाण, पाल ग्रामपंचायत सदस्य स्नेहल पालकर, खानोली मा. सरपंच प्रणाली खानोलकर, स्वप्नील मठकर (मठ), उमेश मठकर, मिलिंद मठकर, निकेत पालकर, दामोदर मठकर, देवदत्त चव्हाण (आरवली), विष्णु अनंत दाभोलकर (दाभोली) इत्यादी अनुसूचित जाती मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!