कणकवली (प्रतिनिधी) : अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था, मुंबई संचलित बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आकाश कंदील स्पर्धा शुक्रवार दिनांक .११ ऑक्टोबर,२०२४ या रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
विरंगुळ्याचे अमृत सिंचन आपल्यास कलावंत प्रदान करीत असतात.मग ते कलावंत कवी, लेखक ,मूर्तिकार, नट आणि चित्रकार रुपात आपणांस भेटत असतात. आपल्यातील असलेल्या कलावंताला जागृत करण्यासाठी आज शुक्रवार दिनांक ११ ऑक्टोबर,२०२४ या रोजी बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘आकाश कंदील स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती.
सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रशालेचे माजी कला शिक्षक शंकर राणे सरांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले.यानंतर प्रमुख पाहुणे व माजी कला शिक्षक श्री. शंकर राणे सरांनी मुलांच्या आकाश कंदीलांचे परीक्षण केले व त्यानंतर प्रत्यक्ष कार्यक्रमास सुरुवात झाली.
या कार्यक्रमासाठी अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेच्या सचिव सुलेखा राणे, संस्थेचे संचालक संदीप सावंत,संस्कृत अध्यापक वळंजू सर,प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनघा राणे उपस्थित होत्या.
कुमारी अवनी तांबे, कुमार जयेश राणे व दुर्वेश साटम यांनी आकाश कंदील स्पर्धेत गुणानुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावल्यामुळ पाहुण्याच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे सहायक शिक्षक प्रशांत कदम सर यांनी केले.तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनघा राणे ,कला शिक्षक आनंद मेस्त्री, श्रीपाद बाणे, सायली साबळे,भाग्यश्री पाटील, जिशना नायर, आकांक्षा प्रभूपेंढारकर, पूजा मेस्त्री, निलेश काळसेकर, गौरव धामणकर यांचे उत्कृष्ट असे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रशांत कदम सर यांनी मानले.