कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील सावडाव येथील गांगेश्वर मंदिराचे पुजारी तथा सावडाव गावच्या देवस्थानचे मानकरी शंकर रामा पुजारे ७९ यांचे हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने कणकवली येथील खाजगी रुग्नालयात बुधवार दि. १६ ऑक्टोबर रोजी उपचारा दरम्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहीत दोन मुलगे, एक मुलगी,जावई, नातवंडे असा परिवार आहे. सावडाव गावच्या जडणघडणीत व विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या परोपकारी, संयमी व नेहमी हसतमुख स्वभावामुळे ते दशक्रोशीत परिचित होते. मुलूंड कोलेजचे ते माजी कर्मचारी होते. गावातील सामाजीक व धार्मिक कार्यात त्यांचा मोलाचा वाटा असायचा. १९ ४५ पासुन ते गावच्या देवस्थानात सक्रीय होते. गांगोची खांब काठी त्यांच्या कडे होती. चिरे वाहतुक व्यावसाईक दिपक पुजारे , ग्रा पं सदस्य तथा बांधकाम व्यावसाईक विलास पुजारे यांचे ते वडिल तर ग्रा.पं. सदस्या वैशाली पुजारे यांचे ते सासरे होत. त्यांच्या निधनाने पंचक्रोशी त हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.