यशराज प्रेरणा संघटना आचरा दशकपूर्ती सोहळा अनोख्या उपक्रमाने साजरा

शासनाच्या “आनंददायी शनिवार” उपक्रमातर्गत त्रिंबक हायस्कूल मध्ये सापां विषयी मार्गदर्शन

आचरा (प्रतिनिधी) : यशराज-प्रेरणा संघटना गेले दशकभर आचरा पंचक्रोशीमध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबवत आहे. यावर्षी या संघटनेला दहा वर्षे पूर्ण झाली, या दशक पूर्ती निमित्ताने आज शनिवार 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 11. 30 या वेळात संघटनेच्या वतीने शासनाच्या आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत जनता विद्यामंदिर, त्रिंबक प्रशालेत सापांविषयी जनजागृती हा उपक्रम राबविण्यात आला.

जिल्हातील सुप्रसिद्ध सर्पमित्र तथा यशराज प्रेरणा संघटनेचे खजिनदार स्वप्निल गोसावी यांनी विद्यार्थ्यांना साध्या आणि सोप्या शब्दात सापांन विषयी परिपूर्ण मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांकडून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रशालेचे मुख्याध्यापक प्रविण घाडीगावकर, यशराज प्रेरणा संघटनेचे अध्यक्ष मंदार सरजोशी, शिक्षक प्रशांत गोसावी, एकनाथ गायकवाड, महेंद्र वारंग, संतोष मेस्त्री, अभिजित धुरे, तावडे मॅडम, यशराज प्रेरणाचे सौ.संगीता चिंबे, सौ. निधी अपराज, शिक्षक वृंद, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!