वैभव मालंडकर मित्रमंडळ आयोजित नरकासुर स्पर्धेत रवळनाथ मित्रमंडळ हळवल प्रथम

संकल्प मित्रमंडळ द्वितीय, स्वयंभू मित्रमंडळ तृतीय

कणकवली (प्रतिनिधी) : वैभव मालंडकर मित्र मंडळ पुरस्कृत बाळगोपाळ हनुमान मित्रमंडळ कांबळे गल्ली आयोजित  नरकासुर  स्पर्धेत श्री देव रवळनाथ मित्र मंडळ हळवल  प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. द्वितीय संकल्प मित्र मंडळ लांजेवाडी तर तृतीय क्रमांक स्वयंभू मित्र मंडळ कणकवली यांनी पटकावला विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम तसेच सहभागी संघांना सन्मानचिन्ह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देत गौरविण्यात आले.

या स्पर्धेचा शुभारंभ बुधवारी रात्री हनुमान मंदिर येथे सामाजिक कार्यकर्ते वैभव मालंडकर व विवेकानंद पाटकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.ही स्पर्धा खुल्या गटात घेण्यात आली होती.या स्पर्धेला स्पर्धकांसह रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.तसेच एका पेक्षा एक सरस असे नरकासुराच्या प्रतिमा सहभागी करण्यात आल्या होत्या. पहिल्याच वर्षी २५ हून  अधिक मंडळांनी आपल्या हस्तकलेतून साकारलेल्या लहान,मोठ्या तसेच हलत्या झुलत्या तर काही नरकासुराला पौराणिक कथेचा आधार देत.एका पेक्षा एक सरस प्रतिमा बनवून त्या स्पर्धेत उतरविण्यात आल्या होत्या.

१० फुटा पासून ते १५ पर्यंतच्या भव्य हुबेहूब नरकासुर प्रतिमा पाहण्यासाठी   रसिक प्रेक्षकांनी रात्रौ ८ वा.पासूनच स्पर्धेच्या ठिकाणी गर्दी केली होती.रात्रौ १२ वा.पर्यंत या ठिकाणी रसिक प्रेक्षकांची गर्दी होती. 

 पहाटे या स्पर्धेतील  सर्व नरकासुराचे दहन करून तसेच फटाके फोडून नरकचतुद्शी साजरी करण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून संतोष सुतार ,गणपत मालंडकर, शशांक बोर्डवेकर व निनाददीप नाईक यांनी काम पाहिले.

दिवाळी सणात नरकासुर बनवण्यासाठी अनेक तरुण दिवस रात्र मेहनत घेत असतात.अशा तरुणांना एकत्र आणून त्याना व्यासपीठ व केलेचा वारसा जपावा.तसेच हिंदू धर्मातील सणाची माहिती व्हावी याच उद्देशाने आपण हि  स्पर्धा घेत असल्याचे वैभव मालंडकर यांनी बोलताना सांगितले. या स्पर्धेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बाळू वालावलकर यांनी मानले. या स्पर्धेसाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

या स्पर्धेवेळी अनिल अणावकर,दिलीप  मालंडकर,योगेश जावकर, किरण पाटकर, विरेश पाटकर, विशाखा पाटकर, वैभवी पाटकर, प्रशांत गवळी,मिलिंद गवळी, प्रियांका मालंडकर, नयन यादव,संदीप गोळवणकर, पंकज कांदळगावकर, निलेश मालंडकर, महेश सोळसकर, नवीन सुतार, लता गोळवणकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!