लक्षतीर्थ परिसरात संत तुकाराम महाराज अमृत महोत्सव सोहळा प्रारंभ

लक्षतीर्थ वसाहत मध्ये भक्तिमय वातावरणात अखंड हरिनामाचा गजर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या 375 व्या त्रिशतकोतरी सोहळ्यानिमित्त लक्षद्वीप परिसरात पारायण व अखंड हरिनाम सप्ताह हाच प्रारंभ झाला. सोमवारी शितोळे सरकार यांच्या ज्ञानेश्वरी माऊलीच्या मानाच्या अश्वाची रिंगण झाले. नगरसेवक राहुल माने यांच्या हस्ते दीपप्रयोजन करून सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. मंगळवारी ऋग्वेदा माने यांच्या प्रमुख उपस्थितीत कुंकू मार्च 16 झाला. लक्षतीर्थेश्वर ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समिती व परिसरातील जवळपास 1000 महिलांनी यामध्ये सहभाग नोंदवला. बुधवारी सोनू बाबा पायी दिंडी भांबड यांचा श्रीहरी पाठ होणार आहे. तसेच गुरुवारी हे. भ. प. श्री तुकाराम महाराज पवार गुरुजी वारकरी विद्यापीठ संस्था कोपरी यांचा श्री रिपोर्ट होणार आहे. व निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन होणार आहे. शुक्रवारी काल्याचे किर्तन होणार आहे. तसेच बाबा महाराज केसरकर यांचे कीर्तन होणार आहे. शुक्रवारी सायंकाळी सात ते दहा या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे आयोजन अजित शिंदे, निखिल पवार, सोमनाथ कुमठेकर,ओंकार शिंदे,सुरेश चाचुर्डे, प्रकाश गिरी, बन्सीधर मांगोरे आदी यांनी केले आहे.

error: Content is protected !!