इतर मुद्देमालासह एकूण २ लाख ८२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
तीन जणांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणे करिता कोल्हापूर जिल्ह्यातील बेकायदेशीर हत्यारे बाळगणारे इसमांना शोधून त्यांच्याकडील हत्यारे व दारुगोळा जप्त करून सदर इसमांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करणेबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आदेश दिले आहेत.
पोलीस यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलीस पथके तयार करून माहिती घेत असताना प्रथमेश गायकवाड रा.येलूर ता. वाळवा. जि. सांगली याच्याकडे बेकायदेशीर गावठी बनावटीची पिस्टल असून तो व त्याचा साथीदार असे दोघेजण त्यांचे कडील होंडा शाईन मोटरसायकल वरून दसरा चौक येथील केएमटी चे बंद असलेले बस स्टॉप जवळ येणार असलेबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार संदीप बेंद्रे यांना माहिती मिळाली. मिळाले माहितीप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांचे पथकाने दि. 25 रोजी दसरा चौकातील केएमटी बंद बस स्टॉप आसपास सापळा लावून प्रथमेश भटूपंत गायकवाड,
राम मारुती सावंत रा.शिरोली पुलाची यादववाडी ता. हातकलंगले कोल्हापूर यांना त्यांचे कब्जातील गावठी बनावटीचे तीन पिस्टल व एक जिवंत राऊंड, होंडा शाईन मोटरसायकल व इतर साहित्यासह पकडले. त्यांचे कब्जातील मिळालेला 2.82,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करून मुद्देमालासह त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांचे कब्जात मिळालेली गावठी बनावटीची पिस्टल व जिवंत राऊंड असा मुद्देमाल शुभम मासोळी रा. यवत, ता.दौड. जि. पुणे याने विक्री करता दिले असे सांगितले. त्यानंतर तपास पथकाने आरोपी शुभम शंकर मासुळे वय 23 रा. इंदिरानगर यवत यास ता.दौड.जिल्हा पुणे येथून ताब्यात घेतले. नमूद इसमाचे लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून. पुढील तपास लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे मार्फत सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित पोलीस अप्पर अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अमंलदार संदीप बेंद्रे, लखन पाटील,विजय इंगळे, विशाल चौगुले,संजय कुंभार, महेश पाटील,महेश खोत, सागर माने,शुभम संकपाळ, रोहित मर्दाने,संजय पडवळ, सतीश जंगम, अमित सर्जे, कृष्णा पिंगळे, हंबीरराव अतिग्रे व सुशील पाटील यांनी केली आहे.














