आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील जागृत देवस्थान “श्री जयंती देवी” पळसंबचा वार्षिक सात प्रहाराचा हरीनाम सप्ताह कार्तिक शु. एकादशी मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजल्या पासून आयोजित केला आहे. तरी दशक्रोशीतील भजन मंडळानी व भाविक भक्तांनी हरीनाम सप्ताहासाठी उपस्थित रहावे असे आवाहन श्री जयंती देवी रवळनाथ पंचायतन देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट पळसंब व ग्रामस्थ भजन मंडळ पळसंब यांनी केले आहे.
पळसंब जयंती देवी मंदिर येथे 12 नोव्हेंबर रोजी हरीनाम सप्ताह












