हुमरट ते नांदगाव तिठा रस्त्यावर सोमवारपासून खड्डे दुरुस्ती – बांधकाम विभागाकडून तात्काळ खुलासा
देवगड निपाणी रोडवरील नांदगाव फोंडाघाट तिठा ते फोंडाघाट खिंडीपर्यंतच्या रस्त्यावरील खड्ड्यांची जबाबदारी हॅम ठेकेदाराची !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : रस्त्यांची खड्ड्यामुळे चाळण आणि संबंधित विभागाचे पावसाळा संपला तरी, अक्षम्य दुर्लक्ष ! ही बातमी प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने खुलासा केला आहे.हुमरठ तिठा ते फोंडाघाट- नांदगाव तिठा रस्त्यावरील खड्डे सोमवारपासून भरण्याची कार्यवाही करीत आहोत, असे कळविण्यात आले आहे. मात्र त्यापुढील फोंडाघाट-बाजारपेठ ते खिंडीपर्यंत चा रस्ता हॅम अंतर्गत वर्ग झाला असून, त्याचे देवगड निपाणी रोडवरील देवगड ते फोंडाघाट खिंडी दरम्यान रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे उद्घाटन नुकतेच आमदार नितेश राणे यांचे हस्ते करण्यात आले होते.त्यामुळे या रस्त्याचे व खड्ड्यांचे काम हॅम ठेकेदाराची जबाबदारी असल्याचेही सूचित करण्यात आले आहे.
वस्तुतः नांदगाव तिठा पासून फोंडाघाट- बाजारपेठ ते खिंडीपर्यंतच्या रस्त्यावरच मोठाल्या खड्ड्यांची मालिका असून, रस्ता वाहन चालकांना त्रासदायक ठरत आहे.त्यामुळे हॅम ठेकेदारांनी विना विलंब काँक्रीटीकरणा चे काम मागे ठेवून,डांबर-खडीने रोलिंग करून खड्डे भरावेत व रस्ता खड्डे मुक्त करावा अशी आग्रही मागणी ग्रामस्थ-व्यावसायिक -वाहन चालकांकडून करण्यात येत आहे.