जिल्हयाची सेवा करण्यासाठीच राणे कुटुंबाचा जन्म – निलमताई राणे

देवगडात नितेश राणेंच्या महाविजयासाठी नारीशक्ती एकवटली

देवगड (प्रतिनिधी) : राणे कुटुंबियांनी जिल्हयाची सेवा करण्यासाठीच जन्म घेतला आहे. आणि हि सेवा जिल्हा वासियांची करीत असताना राणे कुटुंबिय कुठेही कमी पडणार नाही. महिलांची प्रगती हि देशाची प्रगती आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठीही शासनाने विविध योजना राबविल्या आहे. व राबवित आहेत याचा फायदा महिलांना होत आहे. यामुळे पुन्हा महायुतीचे सरकार येणे गरजेचे आहे. असे मत भाजपाच्या नेत्या निलमताई राणे यांनी पडेल कँटिंग येथे आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ महिला मेळाव्यास व्यक्त केले.

यावेळी गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत, भाजपा जिल्हा महिलाअध्यक्ष श्वेता कोरगावकर,शिंदे सेनेच्या जिल्हाध्यक्ष वर्षा कुडाळकर,अस्मिता बांदेकर,सुमित्रा पाताडे,तन्वी चांदोस्कर,प्रियांका साळसकर,देवगड तालुका शिंदे गटाच्या महिला अध्यक्ष निता गुरव, प्रणिता पाताडे, पडेल भाजपा मंडळाच्या अध्यक्षा संजना सावंत, सावी लोके,माजी पंचायत समिती सदस्या शुभा कदम,माजी पंचायत समिती उपसभापती अनघा राणे, माजी पंचायत समिती सदस्या पुर्वा तावडे आदी मान्यवर महिला व बहुसंख्य ग्रामस्थ महिला उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना निलमताई राणे म्हणाल्या कि, पंचेचाळीस वर्षाहुन अधिक नारायण राणे हे राजकारणात आहेत. मात्र त्यांनी राजकारणापेक्षा समाजकारणावरती जास्त भर दिला आहे. म्हणूनच आज सिंधुदुर्ग म्हटले की, नारायण राणे असे समिकरण निर्माण झाले आहे. येथील आमदार नितेश राणे यांनीही गेल्या 10 वर्षामध्ये कणकवली,देवगड,वैभववाडी या विधानसभा मतदार संघांमध्ये प्रत्येक गावांचा विकास केला आहे. येथील जनतेच्या समस्या समजावून घेवून त्याचे निराकरण करण्यामध्ये‍ि नितेश हा मग्न असतो, कुटुंबासोबत राहणे हे त्याच्या नशीबी कमी आहे मात्र त्याने हा मतदार संघच आपला कुटुंब म्हणून स्विकारुन येथील जनतेची आत्मियतेने कामे करीत आहेत.

महामंडळाचे अध्यक्ष पद दिले जे आयुष्यात कोणताही पक्ष देवू शकत नाही त्याच व्यक्तीने राणे साहेबांना धोका देवून त्यांच्याच मुलाच्या विरोधात उभे राहून निवडणुक लढवित आहेत. आमच्या सोबत असतेवेळी त्यांना मान सन्मान दिला,पदे दिली तरी सुध्दा राणे साहेबांच्या मुलाच्या विरोधात उभे राहणे म्हणजे उलटया काळजाच्या व्यक्ती आहेत. असा टोलाही नाव न घेता निलमताई राणे यांना संदेश पारकर यांना टोलावला आहे.यावेळी गोवा राज्याचे मुख्यमंत्री यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत,प्रियांका साळसकर,तन्वी चांदोस्कर यांनी देखील आपले विचार मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!