मात्र व्यापारी,वाहन चालक, पर्यटक आणि प्रवाशांमध्ये प्रचंड संताप
फोंडाघाट (प्रतिनिधी) : तब्बल १६ तासानंतर आरटीओ ऑफिसचे पोलीस कॉन्स्टेबल चोडणकर, साबळे, घाडी यांनी अविश्रांत मेहनत घेऊन, सायंकाळी साडेपाच वाजता फसलेली गाडी बाजूला घेऊन, ट्राफिक दुतर्फा सुरू केले. चेक पोस्टवरील पोलीस कॉन्स्टेबल माने,सहकारी पोलीस पावरा व सहकारी यांनी वाहतूक सुरू होताच , ती सुरळीत होण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. मात्र ट्राफिक दोन्ही बाजूने सुरू होताच एका कंटेनर ने बाजारपेठेमध्ये साईड घेताना, लगतच्या लाईटच्या पोल ला धडक दिल्यामुळे, पार्किंग होऊन पोल वाकला. वायरी तुटल्या. मात्र विद्युत प्रवाह बंद झाल्याने आणि लाईट गेल्याने पुढील अनर्थ टळला. सुमारे दीड- दोन तास खोळंबोली वाहतूक सातत्याने सुरू होती.
मंगळवारी पहाटे दोन वाजता एका खाजगी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून कर्जाची थकबाकी वसूल करण्यासाठी, 30 टन सिमेंट भरलेला ट्रक पळवताना, पुनम हॉटेलच्या खालच्या वळणावर अंदाजानं आल्याने ट्रक एका खोल खड्ड्यात धडकला. त्याचे टायर फुटून १४ चाकी ट्रकाचे पाटे – कमानी तुटले .आणि ट्रक बंद पडला.त्यामुळे मागे खिंडीपर्यंत, व लोरे रस्त्या पासून पाच झाडापर्यंत चिरे भरलेले ट्रक, कंटेनर ,अवजड वाहने, दुतर्फा ठप्प झाले होते. स्थानिक ग्रामपंचायत सदस्य पवन भालेकर आणि सहकार्यांनी फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यासह आपल्या जेसीबीने एका बाजूला केल्यामुळे, चार चाकी छोटी वाहनांची ये जा सुरू होती. घटनेचे गांभीर्य ओळखून आरटीओ पोलीस, स्थानिक पोलीस आणि सेवाभावी ग्रामस्थांनी सहकार्य करून खोळंबलेल्या प्रवासी, चालक यांना पाण्याची व्यवस्था केली. मात्र यावेळी निकृष्ट कामामुळे उखडलेला रस्ता आणि पडलेले खड्डे यामुळे वाहन चालक, पर्यटक, प्रवासी आणि ग्रामस्थ यामधून प्रचंड संताप व्यक्त होत होता…