मर्दासारखे लढा, शिखंडी सारखे लढू नका
संदेश पारकर यांचे आमदार नितेश राणेंना आव्हान
कणकवली (प्रतिनिधी) : माझा आणि माझ्या कुटुंबाचे व्यवसाय ठेवी कर्ज यांची माहिती उमेदवारी दाखल करताना शासनाला प्रतिज्ञापत्र दिले आहे.स्टंटबाज आमदार नितेश राणेसारखा नीच मित्र दुष्मनालाही मिळू नये. माझे बँक लोन नितेश राणे हे त्यांनी फेडल्याचे सांगत आहेत. माझे जाहीर आव्हान आहे की नितेश राणे यांनी माझे बँक लोन फेडल्याचा पुरावा , बँक स्टेटमेंट सादर करावे अन्यथा मी नितेश राणेंविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. मर्दा सारखे लढा, शिखंडी सारखे माझ्याशी लढू नका असा इशारा कणकवली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी चे उमेदवार संदेश पारकर यांनी पत्रकार परिषदेत दिला. हिम्मत असेल तर मर्दासारखे निवडणुक लढवा. शिखंडी सारखे नथीतून तिर चालवू नका.कणकवली विधानसभा मतदारसंघात भगवे वादळ आहे. नितेश राणेंचा पराभव हा निश्चित असल्यामुळे ते दिशाभूल करणारे आरोप करत आहेत.स्टंटबाज आमदार नितेश राणे यांनी माझ्या खाजगी बँक व्यवहाराबाबत भाष्य केले म्हणून ही पत्रकार परिषद घेतल्याचे महाविकास आघाडी चे उमेदवार संदेश पारकर यांनी सांगितले. राणे कुटुंब भाजपात येण्याआधी मी भाजपात होतो. जेव्हा राणे भाजपात आले तेव्हा राणेंच्या राजकीय अपप्रवृत्ती ला विरोध दर्शवत मी भाजपा पक्ष सोडला. माझे मूळ भाजपा च्या सर्व पदाधिकाऱ्यांशी नेत्यांशी चांगले संबंध आहेत.पण जिल्ह्यातील राणे भाजपला विरोध आहे. मी भाजपात प्रवेश करणार म्हणणाऱ्या नीतेश राणेंनी हिम्मत असेल तर मर्दासारखे लढा, शिखंडी सारखे लढू नकात.मागील 10 वर्षांत आमदार म्हणून जनतेचे प्रश्न सोडवू शकला नाहीत त्यावर बोला.माझ्या पत्रकातून नितेश राणेंना विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर द्या असे आव्हानही पारकर यांनी दिले.