उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 16 नोव्हेंबर रोजी कणकवलीत

उपजिल्हा रुग्णालयासमोर नितेश राणेंच्या महाविजयासाठी होणार जाहीर सभा

कणकवली (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री देवेंद्द फडणवीस यांची जाहीर प्रचार सभा 16 नोव्हेंबर रोजी कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर दुपारी 1 वाजता होणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी आमदार नितेश राणे, शहराध्यक्ष अण्णा कोदे उपस्थित होते. कणकवली विधानसभा मतदारसंघाची निवडणूक एकतर्फी आहे. आमदार नितेश राणे यांचा विजय हा नक्की असून देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमुळे नितेश राणे यांचे मताधिक्य आणखी वाढेल असा विश्वास प्रभाकर सावंत यांनी केला.

error: Content is protected !!