आठ विभागातून २८८ स्पर्धांचा सहभाग
तळेरे (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयं, सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा परीषद , सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्तं विद्यमाने आयोजीत राज्यस्तरीय शालेय १४,१७,१९वर्षांतील मुले- मुली कॅरम क्रीडा स्पर्धा सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे दि.१२ ते १४ नोव्हेंबर 2024 दरम्यान चालू असून या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अनिल पाटील,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख,उपसंचालक कोल्हापूर विभाग माणिक पाटील यांच्या शुभहस्ते झाले.
स्पर्धा स्थळी मतदानाची जनजागृतीचा संदेश
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी मतदान जनजागृतीचा संदेश देत सर्वांना शपथ दिली आणि सदर स्पर्धेचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी भूषविले.स्पर्धेमध्ये हार जीत होतच असते पण,खेळाडूंनी खिलाडू वृत्ती कायमची जोपासली पाहिजे व खेळाचा आनंद घेतला पाहिजे असे त्यांनी प्रतिपादन केले.
आठ विभागातून २८८ खेळाडुंना सहभाग
सदर स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या मुंबई, पुणे, लातूर ,छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर ,अमरावती ,नाशिक आणि नागपूर या आठ विभागातून 288 स्पर्धक सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रभरातून पंच व सामना अधिकारी म्हणून 35 अधिकारी उपस्थित आहेत. सदर स्पर्धेसाठी खेळाडू पंच व सामनाधिकारी त्याचबरोबर पालक असे तीनशे पन्नास जण उपस्थित आहेत.
उद्घाटन प्रसंगी सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचे प्राचार्य एन डी गावडे ,महाराष्ट्र राज्य कॅरम संघटनेचे तांत्रिक समितीचे योगेश फणसळकर, रत्नागिरी चे सचिव मंदार दळवी,मिलिंद साप्ते ,क्रीडा मार्गदर्शक श्रध्दा तळेकर ,माधुरी घराळ, क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड, वरीष्ठ लिपिक सुरेकर हे उपस्थित होतें.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल गायकवाड यांनी केले व आभार प्राचार्य गावडे यांनी केले. स्पर्धा पार पाडण्यासाठी क्रीडा कार्यालयात सिध्दांत रायकर,मंगेश माने, श्री.सावंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील इतर कर्मचारी, सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन ,सिंधुदुर्ग सैनिक स्कूल मधील सतीश अहिर ,श्री.पवार,शिक्षक वर्गआणि इतर सर्व स्टाफ आदीं परिश्रम घेतले.