भाजपा प्रवक्ते तथा आमदार नितेश राणे यांनी केला सवाल
भाजपा व महायुतीच्या जाहिरातींवर आक्षेप असेल तर तुमच्या मुखपत्रात छापू नका
कणकवली (प्रतिनिधी) : भाजपा व महायुतीच्या नेत्यांच्या जाहिरातींवर आक्षेप असेल तर छापू नका. तुम्हाला या जाहिराती सामन्यामध्ये चालतात. म्हणजे तुम्हाला महायुतीचा पैसा चालतो. केवळ सकाळी उठून डबलढोलकीपणाने खडी फोडायची हा प्रकार जनता आता चांगल्या प्रकारे ओळखत आहे. तुम्हाला गौतम अदाणी एवढे खटकत असतील तर त्यांचं विमान कसं चालतं? लपून-छपून कोण भेटतं याची माहिती आम्ही जाहीर करायची का? असा सवाल भाजपा प्रवक्ते तथा आमदार नितेश राणे यांनी केला.
येथे पत्रकारांशी बोलताना आमदार राणे म्हणाले हे नौटंकीबाज गौतम अदानी त्यांच्यासोबत बसून ढोकळा आणि चटणी खातात आणि इतर वेळी त्यांच्यावर टीका करतात. हा नौटंकीपणा जनतेने ओळखलेला आहे. संजय राजाराम राऊत तुझ्या मालकाच्या घरातील वस्तूही उद्योगपतींच्या पैशातून येतात.
काल उद्धव ठाकरेंची सभा झाली ठाकरेंच्या सभेच्या आमच्या उमेदवारांच्या विजयात निश्चितपणे खारीचा वाटा असणार आहे. काल आणलेला कोळी आमच्यावर टीका करायला आला. त्याने केलेल्या टिकेवर जनताच नाराज आहे. हे घराणेशाही बद्दल बोलतात त्यांनी थोडे मागे वळून बघितले असते तर त्यांना घराणेशाही तेथेच दिसली असती. मग घराणेशाही वर बोलण्याचा नैतिक अधिकार उद्धव ठाकरेंना नाही. उद्धव ठाकरेंनी घराणेशाहीवर पीएचडी केलेली आहे. उद्धव ठाकरेंच्या जुन्या टेप रेकॉर्डर ला आता लोक कंटाळली आहेत.
उद्धव ठाकरेंना लोकसभेला जनतेने चूक केली असं म्हणायचं आहे का? विधानसभेला यांनी दिलेल्या तीन उमेदवारातील दोन उमेदवार बाहेरील पक्षातील आहेत ते निष्ठावान शिवसैनिक कुठे आहेत असा सवाल नितेश राणे यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्या बॅगाची तपासणी केली त्याचं कारण हा पुरुष दिसणारा माणूस खरंच पुरुष आहे का हे पाहण्यासाठी तपासणी केली असेल.
या देशाचा नागरिक देशात राहणारा नागरी देशप्रेमी असावा असे आमचे मत आहे. जे इस्लामीकरण करू पाहत आहेत त्यांच्या विरोधात आमच्या लढा आहे.
कालच्या दौऱ्यात चप्पल, आव्हान, गुंडगिरी यावरच बोलले. यापेक्षा तुम्ही सत्तेत असताना काय केले? हे प्रचार सभेत सांगण्याची गरज होती. विकासाचा एक तरी मुद्दा आला का कालच्या भाषणात. विकासाचा एक तरी मुद्दा आला असला तर दाखवा मी बक्षीस देतो.
दरोडेखोर कोण हे चांदीवाल आयोगाच्या प्रमुखांनी सांगितले आहे. या दरोडेखोरांचा बादशहा आणि दलाल आमच्या जिल्ह्यात येऊन गेला. मालवण किल्ल्यावरील शिवमंदिरासाठी 50 लाख देणार होता. त्याबाबत थोबाड उघडून बोलत नाही. 23 तारीख नंतर तुम्ही बेरोजगार होणार आहात. पुतळा तयार झाला की फोटोग्राफीची ऑर्डर तुम्हाला देतो .
येथील बागायतदारांसाठी अनेक योजना आहेत. त्या उद्धव ठाकरेंना दिसत नाहीत. कालच्या उद्धव ठाकरेंच्या सभेत हिंदू किती होते आणि गोल टोपीवाले किती होते. बाळासाहेब आणि भाजपा यांचे संबंध उद्धव ठाकरेंना समजणार नाही. तेवढी त्यांची अक्कल नाही उद्धव ठाकरे त्यावेळी कॅमेरा साफ करत होते अशी टीकाही नितेश राणे यांनी केली.