भाजप महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या विजयाचा केला संकल्प
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कोंडीये गावातील असंख्य युवा कार्यकर्ते व ग्रामस्थांनी भाजप महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या विजयाचा संकल्प करत भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला. या सर्व ग्रामस्थांचे पक्षात आमदार नितेश राणे यांनी स्वागत केले.
यावेळी प्रवेश करणाऱ्यांमध्ये विनीत सावंत, विजय बोरकर, संजय वागटे, अविनाश काटे, संतोष परब, विजय गावकर, दिगंबर घाडीगावकर, चंद्रकांत आंबेडकर,सिताराम आंबेडकर, जगन्नाथ आंबेडकर, उत्तम आंबेडकर, शांताराम आंबेडकर ,अशा युवा कार्यकर्ते आणि ग्रामस्थांसह असंख्य जणांचा समावेश आहे.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोठा सावंत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संजना सावंत माजी पंचायत समिती सदस्य राजश्री पवार,सरपंच ऋतुराज तेंडुलकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.