विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वुभूमीवर

कोकण विभागीय सहआयुक्त संजीव पलांडे यांची खारेपाटण हायस्कूल येथील मतदान केंद्राला सदिच्छा भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ च्या पार्श्वभूमीवर कोकण विभागीय सहआयुक्त संजीव पलांडे यांनी नुकतीच गुरवार दि.१४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील शेठ न म विद्यालयातील दोन मतदान केंद्राला सदिच्छा भेट देऊन मतदान केंद्राची पाहणी केली. तसेच येथील मतदान केंद्राच्या सोयी सुविधांचा आढावा देखील जाणून घेतला.

सद्या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण तापले असून प्रचार देखील शिगेला पोहचला आहे.तर निवडणूक आयोग देखील सद्या ॲक्शन मोड वर आला असून मतदान केंद्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने व मतदानाच्या दिवशी मतदारांची कोणतीही गैरसोय होऊ नये याकरिता रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाच्या मतदान केंद्राना कोकण विभागीय सहआयुक्त संजीव पलांडे यांनी भेट दिल्या. व पाहणी केली.यावेळी त्यांच्या सोबत सहाय्यक मतदान अधिकारी पंजाबराव पवार, कणकवली निवासी नायब तहसीलदार मंगेश यादव,मंडळ अधिकारी तळेरे श्री नागावकर भाऊ,खारेपाटण तलाठी अम्रसकर भाऊ,बी एल ओ – प्रथमेश गुरसाळे,श्री तेरवणकर सर आदी मान्यवर उपस्थित होते.

खारेपाटण हायस्कूल येथील विधमसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ मतदान केंद्र क्र.१९९/२६८ व मतदान केंद्र क्र.२००/२६८ या दोन्ही केंद्रांना कोकण सह आयुक्त श्री पलांडे यांनी भेट देऊन पाहणी केली.व संबधीत कर्मचारी वर्गाकडून अधिकची माहिती जाणून घेतली. यावेळी खारेपाटण हायस्कूलचे मुख्याद्द्यापक श्री संजय सानप यांनी मान्यवर अधिकाऱ्यांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी खारेपाटण सिनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे,खारेपाटण शिक्षण संस्थेचे संचालक योगेश गोडवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!