वैभववाडी येथील प्रचार सभेत महायुती सरकारचे काढले वाभाडे
वैभववाडी (प्रतिनिधी) : कणकवली मतदार संघामध्ये परिवर्तन अटळ असून नितेश राणे यांच्याकडे कोणताही विकासाचा रोड मॅप नसल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरून ते धार्मिक तेढ निर्माण प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्या या कृतीमुळे महाराष्ट्रात गुनागोविंदाने राहणाऱ्या 12 पक्कड जातीमध्ये भांडण लावून पिढ्यानपिढ्या सुरू असलेली गाव गाड्याची विन उसविण्याचे काम करीत आहेत.धनशक्तीच्या जोरावर त्यांचे राजकारण सुरू आहे.असा घणाघाती आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी वैभववाडी येथे केले आहेत.
महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संदेश पारकर यांची प्रचार सभा वैभववाडी येथील दुर्गा माता उत्सव मंडळाच्या पटांगणावर झाली. यावेळी व्यासपीठावर ब्रिगेडियर सुधीर सावंत,संदेश पारकर,गौरीशंकर खोत,सतीश सावंत,अतुल रावराणे,परशुराम उपरकर,सुशांत नाईक,दिगंबर पाटील, अनंत पिळणकर, मीनाताई बोडके,दादामिया पाटणकर,संदीप कदम, मंगेश लोके, विशाल जाधव, रविंद्र चव्हाण, रणजीत तावडे, यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. नितेश राणे यांच्यावर टीका करताना सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या महाराष्ट्रात फिरण्यापेक्षा प्रथम स्वतःच्या मतदारसंघात काय विकास केला विकासाच्या रोडमॅप बद्दल कधी काय बोलला आहात काय? याबद्दल बोला गुंडगिरी दादागिरी जातीयवाद धर्मवाद पसरविणारा आमदार आपल्याला हवाय का?असा प्रश्न उपस्थित केला. तर स्वतःच्या वडिलांचा ही पत्ता विसरणारे हे आहेत. आई-वडिलांचे हेच संस्कार आहेत का असा प्रश्न करीत यासाठी बदल हवा असे सांगितले.
राज्य सरकारवर टीका करताना अंधारे पुढे म्हणाल्या राज्यातील महिलांना 1500 चे अप्रुभ नसून त्यांना सुरक्षितता हवी आहे. बदलापूर येथील घटनेमध्ये आंदोलन झाल्यानंतर एफ आय आर दाखल होतो. आपल्यावर झालेल्या अन्यायाची पोलिसांनी एफ आय आर दाखल करून घेतली नसल्याने हे सरकार किती संवेदनशील आहे हे यावरून दिसून येते. असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे आणि गृहमंत्री फडणवीस यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली.
जिल्ह्यातील अनेक विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असून सामाजिक न्याय विभागाकडून दलित वस्त्यांमध्ये पुरविलेल्या बेंचेस सौर लाईट मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप त्यांनी यावेळी केले आहेत. जर ते उद्या मतासाठी पैसे वाटणार असतील तर ते तुमच्या मदतीला कधीही येणार नाहीत. त्यामुळे येथील जनता अन्याय हुकूमशाही दडपशाहीच्या विरोधात नक्की मतदान करेल असा विश्वास व्यक्त करीत संदेश पारकर यांचा विजय निश्चित होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
यावेळी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सध्याचे सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेले सरकार असून शिवाजी महाराजांचा पुतळा का पडला याचा विचार करा. सरकारने केलेला तो मोठा गुन्हा आहे यांना जनता माफ करणार नाही असे सांगितले.शिवसेनेचे नेते परशुराम उपरकर म्हणाले पिता पुत्रांनी फक्त स्वतःचे व्यवसाय वाढविले आहेत. येथील विकास कामांवर कमिशन घेण्याचे काम ते करीत आहेत करुळ गगनबावडा घाट गेले दहा महिने बंद असून जनतेसह व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे याकडे यांचे दुर्लक्ष का. मुस्लिम बांधवांनी नितेश राणे यांचा गोविंदा करण्याचे ठरविले आहे. तर भारतीय जनता पार्टीत माझे अनेक जुने सहकारी असून त्यांचीही तेथे घुसमट होत आहे त्यांच्यावर नितेश राणे यांची उमेदवारी लादली आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना संपविण्याची भाषा केली होती त्यांच्यावरच धनुष्यबाण घरोघरी घेऊन फिरण्याची वेळ आली आहे. शिवसेनेचे नेते गौरीशंकर खोत म्हणाले भारतीय जनता पार्टी जाती-धर्माचे राजकारण करून हिंदू खतरे मे है असा खोटा प्रचार करीत आहेत मात्र हिंदू खतरे मे नसून भाजप खतरे मे है. राणे गेल्या 34 वर्षात विकास करू शकले नाही ते पुढे काय करणार असा सवाल त्यांनी केला आहे.तर विधानसभेचे उमेदवार संदेश पारकर यांनी सर्वसामान्यांचा आवाज विधानसभेत पोहोचविण्यासाठी आपल्याला मतदान करा असे आवाहन केले आहे.