कोळोशी येथील धक्कादायक घटना
नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) : कणकवली तालुक्यातील कोळोशी वरचीवाडी येथे दोन पाळीव कुत्र्यांनी गावठी बाॅम खाल्याने जागीच मृत्यूमुखी पडले.या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे.हा स्फोट एवढा भयंकर होता की, कुत्र्यांच्या जबड्याच्या चिंधड्या झाल्या. दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिकांसह नागरिकांकडून करण्यात येत आहे. सदरची घटना शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोळोशी वरचीवाडी येथील रहिवासी श्री. बाळा सुर्वे, अनिल इंदप याचे पाळीव कुत्रे नेहमीप्रमाणेच परीसरात फिरत असताना त्याची नजर अज्ञांताकडेन ठेवण्यात आलेल्या गावठी बाॅमकडे वळली असता यातील एका कुत्र्याने आयनल घाटी येथे बॉंब खाताच जागच्या जागी ठार झाला तर दुसरा कुत्रा बॉंब तोंडातून वस्तीत रस्त्यावर आणून चावत असताना स्फोट होऊन मृत्यू पावला.या आवाजाने जाऊन पाहिले असता कुत्र्याच्या तोंडाचे तुकडे तुकडे झाले होते.
याची माहिती कणकवली पोलीस याना देण्यात आली. यावेळी घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक खंडागळे, जाधव, पार्सेकर, पशुवैद्यकीय अधिकारी , पोलिस पाटील संजय गोरुले, उपसरपंच अतुल गुरव,भाऊ इंदप पाहणी करून पंचनामा केला.याबाबत सदरची घटना कोणी केली याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत़.यानंतर श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते.
फिरणेही धोकादायक
सध्या काजूचा हंगाम सुरू असल्याने बागेत जर असे बॉंब ठेवले गेले तर चूकून एखाद्याचा पाय पडून मणुष्य हानी होण्याची शक्यता आहे.यासाठी कठोर उपाययोजना होणे गरजेचे आहे.
सध्या काजूचा हंगाम सुरू असल्याने बागेत जर असे बॉंब ठेवले गेले तर चूकून एखाद्याचा पाय पडून मणुष्य हानी होण्याची शक्यता आहे.यासाठी कठोर उपाययोजना होणे गरजेचे आहे.