“आमदार नितेश राणे यांना भरघोस मतांनी निवडून आणणार..”– शबान मुजावर
खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांना भरघोस मतांनी निवडून आणणार असून मुस्लिम समाज नेहमीच आमदार नितेश राणे यांच्या पाठीशी राहिला आहे.आमदार नितेश राणे आपल्या मतदार संघात करत असलेल्या विकास कामांचा विजयी रथ कोणीच रोखू शकत नाही.अशी प्रतिक्रिया शेर्पे येथील मुस्लिम बांधव व बूथ अध्यक्ष शबान मुजावर यांनी आमदार नितेश राणे यांच्या शेर्पे गावातील प्रचारा दरम्यान व्यक्त केली.
महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज शनिवारी शेर्पे गावात भाजप कार्यकर्ते व माजी जि.प.सदस्य श्री रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला.यावेळी भाजप शक्ती केंद्र प्रमुख श्री सूर्यकांत भालेकर,शेर्पे सरपंच सौ स्मिता पांचाळ,उपसरपंच सिराज मुजावर,माजी सरपंच श्रीम निशा गुरव,माजी उपसरपंच महमद जैतापकर,ग्रा.पं.सदस्य सायली पांचाळ,शीतल कांबळे यांसह
रहेमान रमदुल रजाक मुजावर, महंमद रमदुल,गणी रमदुल,गफार मुजावर,सुलताना मुजावर,शहिदा मुजावर, शरफुद्दिन मुजावर,अमीन मुजावर,दाऊद जैतापकर,रोशन रमदुल,महमूद रमदुल,अकबर मुजावर,रुकिया रमदुल,हसीना रमदुल,मेहराज रमदुल आदी मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते.
आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून आमच्या शेर्पे मुस्लिम वाडीतील बरीचशी विकासाची कामे झाली असून आमच्या संपूर्ण समाज बांधवांचा त्यांना पूर्ण पाठींबा राहील अशी प्रतिक्रिया यावेळी स्थानिक ज्येष्ठ मुस्लिम ग्रामस्थ रहेमान माहमुद्द रमदुल यांनी व्यक्त केली. तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते श्री रज्जाक कादर मुजावर यांनी देखील भाजप कार्यकर्ते रवींद्र जठार व आमदार नितेश राणे यांच्यामुळेच या गावातील विकासकामे होत असून त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे.या पुढील देखील विकासकामे ते पूर्ण करतील अशी आमची खात्री असल्याची प्रतिक्रिया यावेळी दिली.
दरम्यान भाजप आमदार नितेश राणे यांना शेर्पे गावातून मुस्लिम बंधवांसह गावातील इतर समाजातील मतदार नागरिकांचा देखील भरघोस पाठिंबा मिळत असून आमदार नितेश राणे बाबत मुस्लिम समाजात द्वेष पसरविण्याचे काम विरोधक करत आहे.मात्र त्यांचा हा फेक नेरेटीव्हचा प्रयोग असफल ठरणार असून नितेश राणे यांनी कधीच जाती पातीचे राजकारण न करता सर्वप्रथम तो आपला कार्यकर्ता आणि त्याच्या मदतीला सदैव धाऊन गेले आहेत.त्यामुळे येथील मुस्लिम बांधवांचा आमदार नितेश राणे यांना मिळत असलेला पाठिंबा हा विरोधकांना एक प्रकारे चपराक देणारा आहे अशी प्रतिक्रिया भाजप कार्यकर्ते श्री रवींद्र उर्फ बाळा जठार यांनी शेर्पे येथे महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारा दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.












