खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण नजीक नडगिवे घाटीत आज सकाळी ८.०० वाजताच्या सुमारास एका अवघड वळणावर गोवा वरून आलेला व मुंबईच्या दिशेने जाणार अवजड वाहन क्र.एम एच -४६/सी एल – १३४१ हा कंटेनर पलटी होऊन मोठा अपघात झाला.या अपघातात वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की,कणकवली तालुक्यातील नडगिवे घाटीत व जि.प.प्राथमिक शाळेसमोर अवघड वळणावर मासळी ने पूर्ण भरलेला १८ चाकी मोठा कंटेनर वाहन चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर पलटी झाला.व या वळणात सुमारे २०० मिटर लांब सदर वाहन रोडवरून फरफटत गेले. या अपघातात वाहन चालक शेशनाथ चव्हाण वय – ३५ राहणार उत्तरप्रदेश याचा डाव्या बाजूचा पाय गुडघ्यातून पूर्ण तुटला असून तो गंभीर रित्या जखमी झाला आहे.तर वाहनाचे देखील मोठे नुकसान झाले आहे.याबाबत नडगिवे गावचे पोलीस पाटील जितेंद्र मण्यार यांनी सदर अपघाताची माहिती खारेपाटण पोलीस स्टेशन ला दिली.
या अपघाताची माहिती मिळताच तातडीने खारेपाटण चेक पोस्ट पोलीस दूरशेत्राचे पोलीस अंमलदार श्री चंद्रकांत माने यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली.व अपघातग्रस्त जखमी वाहन चालक शेशणाथ चव्हाण याला १०८ अँब्युलन्स ने ओरोस जिल्हा रुग्णालय येथे उपचाराकरिता पाठवले.अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस ए एस आय देसाई,देवेंद्र जाधव, संकेत चिंदरकर यांनी देखील घटनास्थळी भेट दिली व अपघाताची पाहणी केली.या अपघाताचा अधिक तपास खारेपाटण पोलीस दूरशेत्राचे कर्मचारी करीत आहेत.
दरम्यान मुंबई – गोवा महमांर्गावरील नडगिवे घाटीत दर १५ दिवसांनी अपघात घडत असून सदर घाट अपघाताचे केंद्र बनले असून येथील अपघातात आजपर्यंत कित्येक व्यक्तीचे बळी गेलेले आहेत.
याला कारणीभूत म्हणजे महामार्ग बनवताना न काढलेली अवघड वळणे आणि महामार्ग प्राधिकरणाचे याकडे झालेले अशम्य दुर्लक्ष होय.
तरी सबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लोकांचे नाहक बळी जाणारे वाचवले पाहिजेत.