महायुतीच्या कार्यकर्त्यांचा वाढवला उत्साह ; जास्तीत जास्त मतदारांना प्राेत्साहित करण्याचे केले आवाहन
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरु झाली आहेत. सकाळी ७.३० वाजल्यापासुनच महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांनी मतदान केंद्रांच्या बाहेर असलेल्या महायुतीच्या बुथना भेटी दिल्या. यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत जास्तीत जास्त मतदारांना बाहेर काढण्याचे आवाहन आ.नितेश राणे यांनी केले आहे.
यावेळी आ.नितेश राणे यांनी कणकवली येथुन देवगडपर्यंत असणाऱ्या सर्व बुथना भेटी देत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी आ.नितेश राणे यांच्या चेहऱ्यावर मोठा उत्साह दिसुन येत होता.
असलदे येथील महायुतीच्या बुथवर आ.नितेश राणे यांनी भेट देत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. यावेळी सर्वांनीच आ.नितेश राणे यांना विजयी खूण दाखवत शुभेच्छा दिल्या.