ओराेस येथील हिंदू न्याय यात्रा सभेत आमदार निलेश राणे यांचा इशारा
ओराेस (प्रतिनिधी) : केवळ भगवा हातात घेवून चालणार नाही तर भगवा रक्तात असला पाहिजे. यापुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही गायीला हात लावून गो हत्या केली गेल्यास आम्ही शिल्लक ठेवणार नाही. पोलिसांनीही अशा व्यक्तींना रोखावे.अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील,असा गर्भित इशारा आ निलेश राणे यांनी बांगलादेश हिंदू न्याय यात्रा सभेत बोलताना दिला.
यावेळी पुढे बोलताना आ निलेश राणे यांनी, बांगलादेशी हिंदूंवर गेले वर्षभर अत्याचार सुरू आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी आपण एकवटले आहोत. यापुढे आपल्याला सतर्क राहायचे आहे. मुस्लिमांना पूर्ण जगात राज्य करायचे आहे. त्यासाठी त्यांना हिंदूंना संपवायचे आहे. त्यामुळे आपल्यावर कधी संकट येईल, हे सांगता येणार नाही. यासाठी मुक मोर्चाचा हिंदू संघटनांनी केलेला प्रयत्न अभिनंदनीय आहे. अनेक हिंदूंनी धर्म रक्षणासाठी स्वतःचा बळी दिला आहे. बांगलादेशी आपल्या देशात सुद्धा राहत आहेत. या देशद्रोहीना आपल्या देशात राहण्याचा अधिकार आहे का ? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिकविनी प्रमाणे शत्रू प्रमाणे आपण वागले पाहिजे. आपण हिंदू चारही बाजूने वेधले जात आहोत. त्यामुळे बांगलादेशातील अत्याचार ही एक सुरुवात आहे. यावर केवळ एक मोर्चा काढून चालणार नाही. आमच्या हनुमान जयंती, रामजन्म, गणपती विसर्जन रॅलीवर दगडफेक केली जाते. हे सर्व थांबवायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केवळ ४८ तास पुरेसे आहेत, असे सांगितले.