फोंडाघाट (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर राजभवन येथे करण्यात आला यावेळी महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी संपन्न झाला यावेळी कणकवली विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची हॅट्रिक करताना मोठ्या मताधिक्याने विजय झालेले आमदार नितेश राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच नवीन कुर्ली गावात जल्लोष करण्यात आला यावेळी फटाक्याची आतषबाजी आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला तसेच मिठाई वाटप करण्यात आले.
यावेळी नवीन कुर्ली गावातील सर्व भाजप कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.