उद्या डामरे येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिन उत्सवाचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ देवस्थान डामरे कानडे वाडी येथे उद्या गुरुवार दि. २३ मार्च, २०२३ रोजी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यात सकाळी ८ ते ११ धार्मिक विधी, दुपारी ११ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२.३० वाजता श्रींचा महानैवेद्य आरती व महाप्रसाद, सायं, ६.३० वाजता श्रींचा पालखी आनंद सोहळा, रात्रौ ८ तव १० पर्यंत महाप्रसाद, रात्रौ ८ ते ११ श्री सौभाग्यलक्ष्मीसोनू प्रा. भजन मंडळ तिवरे बुवा अजित गोसावी आणि श्री स्वामी समर्थ नवतरुण प्रा. भजन मंडळ लोरे नं. १ बुवा कु. रिया मेस्त्री यांचा भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी या सोहळ्यास सर्व स्वामी भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री स्वामी समर्थ भक्त मंडळी, डामरे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

error: Content is protected !!