कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका पेन्शनर असोसिएशन,कणकवलीची वार्षिक सर्वसाधारण सभा अन स्नेहसंमेलन रविवार दिनांक 29 डिसेंबर 24 रोजी सकाळी 10 वाजता हॉटेल रॉयल सिटी इन, मुंबई गोवा हायवे, सारस्वस्त बँकेचे मागे तळमजला, कणकवली येथे आयोजित करण्यात आली आहे. मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, वार्षिक अहवाल वाचन व मंजुरी, सन 23-24 चे वार्षिक जमाखर्चास मंजुरी, सन 24-25 चे वार्षिक अंदाजपत्रकास मंजुरी, 75 वर्षावरील सभासदांचा सत्कार, मान्यवरांची मनोगते व मार्गदर्शन, आयत्या वेळेच्या विषयांवर चर्चा करणे, अध्यक्षीय संभाषण,आभार अशी कार्यक्रम पत्रिका आहे. दुपारी 1-30 ते 2-30 स्नेहभोजन त्यानंतर 2-30 ते 4-30 स्नेहसंमेलनात कराओके गायन, वादन, कविता, संगीत खुर्ची अन अन्य मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले आहे. सभेस कणकवली तालुक्यातील सर्व पेन्शनर सभासदांनी समयोचित आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन अन विनंती पेन्शनर असो कणकवली तालुक्याचे वतीने सीताराम उर्फ दादा कुडतरकर, अध्यक्ष विलास चव्हाण, सचिव कणकवली तालुका पेन्शनर असो कणकवली अन समस्त कार्यकारिणी ने केले आहे.
कणकवली तालुका पेन्शनर असोसिएशन, कणकवलीची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि स्नेहसंमेलन 29 डिसेंबर रोजी












