स्टेअर्स फाऊंडेशन कोल्हापूर जिल्हाप्रमुखपदी राहुल देवकुळे यांची निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्टेअर्स फाऊंडेशन, कोल्हापूर जिल्हाप्रमुखपदी राहुल आनंदा देवकुळे यांची निवड करण्यात आली आहे. कराटे या क्रीडा प्रकाराचा राज्यभर प्रचार व प्रसार करण्यासाठी युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार शी संलग्न असणाऱ्या स्टेअर्स फाउंडेशन च्या कोल्हापूर जिल्हाप्रमुख पदी कराटे प्रशिक्षक राहुल आनंदा देवकुळे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे टूर्नामेंट टेक्निकल डायरेक्टर गणेश मंगल गिरी तसेच कराटे प्रमुख विशाल जाधव, महाराष्ट्र राज्याचे स्पर्धा समिती चेअरमन राजकपूर बागडी याच्याद्वारे करण्यात आली. राहुल आनंदा देवकुळे यांच्या स्टेअर्स च्या कोल्हापूर जिल्हाप्रमुख पदी झालेल्या निवडी मुळे जिल्ह्यातील कराटे खेळाडूंना स्टेअर्स (युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार) च्या माध्यमातून जिल्हा, राज्य, राष्ट्रीय कराटे स्पर्धा खेळण्याची संधी मिळणार आहे. तसेच मुलींना व महिलांना स्वतःचे स्वरंक्षण करता यावे यासाठी जिल्ह्यात कराटे प्रशिक्षण शिबिर देखील घेतली जाणार आहेत.

error: Content is protected !!