कणकवली (प्रतिनिधी) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती वरवडे ग्रामपंचायत मध्ये साजरी करण्यात आली. सरपंच करुणा घाडीगांवकर उपसरपंच अमोल बोंद्रे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत अधिकारी प्रफुल्ल धुरी, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप कदम, अंकिता घाडीगांवकर, ग्रा पं कर्मचारी विनायक घाडीगांवकर, संतोष उबारे, आबा भाबल, अभि शिंदे आदी उपस्थित होते.












