संविधान प्लॅटिनम उत्सव वर्षानिमित्त भारतीय लोकतांत्रिक समाज महासंघाकडून 4 जानेवारी रोजी परिसंवाद
कणकवली (प्रतिनिधी) : 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानची अंमलबजावणी झाल्यानंतर मागील 75 वर्षांत संविधानाने आम्हाला काय दिले ? नागरिकांनी संविधानिक नितीमत्तेसाठी काय केले ? या विषयावर भारतीय लोकतांत्रिक समाज महासंघाने शनिवार 4 जानेवारी रोजी दुपारी 3 : 30 ते 5 : 30 या वेळेत हॉटेल रिलॅक्स कॉन्फरन्स हॉल येथे परिसंवादाचे आयोजन केले आहे. भारतीय लोकशाही समाज संघाचे राष्ट्रीय संयोजक ऍड. रावसाहेब मोहन, सामाजिक कार्यकर्ते ऍड.मनोज रावराणे हे प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत.भारतीय लोकशाही समाज संघाचे राष्ट्रीय सहसंयोजक सूर्यकांत कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात भारतीय संविधानाने दिलेले ध्येय आणि मूल्ये समाजात रुजविण्यात यशस्वी ठरलो का ? या बाबत उहापोह करण्यात येणार आहे.
यावेळी भारतीय लोकशाही समाज संघाचे उत्तरप्रदेश येथील राष्टीय सहसंयोजक रामेश्वर दयाल, भारतीय लोकशाही समाज संघाचे महाराष्ट्र राज्य सहसंयोजक अशोक नागटिळक, अभिषेक पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.












