कणकवली शहर ही राणे कुटुंबाची ओळख ; कणकवलीच्या सर्वागीण विकासासाठी लागेल तो निधी देणार
कणकवली पर्यटन महोत्सवाचे मत्सोद्योग बंदर विकास मंत्री नितेश राणेंच्या हस्ते शानदार उदघाटन
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गात पर्यटन महोत्सव आणि त्यातून जिल्हा पर्यटनाला आणि आर्थिक उलढालीला चालना देणे याची सुरुवात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली. राणे कुटुंबाची कणकवली शहरामुळे ओळख आहे.त्यामुळे कणकवली चे नाव राज्यात आणि देशात उंचावण्याची जबाबदारी आमची आहे.पर्यटन कणकवली पर्यटन महोत्सवच्या माध्यमातून टीव्हीवर दिसणारे देशातील दिग्गज कलाकार प्रत्यक्ष पाहण्याची ,त्यांची कला प्रत्यक्ष पाहण्याची संधी जनतेला मिळते. कणकवली पर्यटन महोत्सव आता ब्रँड तयार झाला आहे. कणकवली नगरपंचायतची सत्ता माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली मागताना कणकवली शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा शब्द दिला होता. तो शब्द आज आम्ही पाळला आहे याची प्रचिती कणकवली शहर फिरताना जनतेला येत आहे. आता मीच मंत्री झाल्यामुळे कणकवली च्या विकासाच्या केवळ नियोजन आराखडा बनवा लागेल तो निधी देण्याची जबाबदारी माझी आहे. केवळ आमदार असताना पोदार इंटरनॅशनल स्कुल, जाणवली नदीवरील पूल, कणकवली रेल्वे स्टेशन सुशोभीकरण, गार्डन, स्पोर्ट्स कॅम्प्लेक्स , डीपी रोड, रिंग रोड चे जाळे उभारले. आता पुढील 5 वर्षांत विकासाचा आणखी पुढील टप्पा गाठण्याचा आमचा संकल्प आहे. उद्या नगरपंचायत निवडणुका लागतील.तेव्हा विरोधक जागे होतील. पण आम्ही मात्र कणकवली करांच्या सेवेत कायम होतो आणि असणार आहोत.केंद्रात राज्यात सत्ता आपली आहे. खासदार आपले राणे साहेब आहेत. मी स्वतः कॅबिनेट मंत्री आहे.सिंधुदुर्ग वर प्रेम करणारे आपले मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कणकवली शहराच्या न भूतो अशा विकासासाठी निधीची कमतरता कधीच भासणार नाही असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. कणकवली पर्यटन महोत्सवाचे उदघाटन कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कणकवली पर्यटन महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले.त्यावेळी मंत्री नितेश राणे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, माजी जि प उपाध्यक्ष संदेश सावंत, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, नगरपंचायत मुख्याधिकारी गौरी पाटील, भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, माजी नगरसेवक संजय कामतेकर, अभि मुसळे, विराज भोसले, बाबू गायकवाड, शिशिर परुळेकर,माजी नगरसेविका सुप्रिया नलावडे, मेघा गांगण , कविता राणे, प्रतीक्षा सावंत, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, प्राची कर्पे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना समीर नलावडे म्हणाले की, 2008 साली जेव्हा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली कणकवली नगरपंचायत ची सत्ता जनतेने आम्हाला दिली. तेव्हा रानेसाहेबांनी कणकवली शहरात पर्यटन महोत्सव व्हायला पाहिजे. तेव्हापासून सत्ता असो अथवा नसो पर्यटन महोत्सव चे आयोजन आम्ही करत आहोत.या पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून कणकवली शहरातील स्थानिकांना रोजगार मिळत आहे. केवळ आमदार असताना नितेश राणे यांनी कणकवली शहराचा कायापालट मागील 5 वर्षात केला आहे. आता नितेश साहेब कॅबिनेट मंत्री आहेत. आता कणकवली शहराचा अश्वगतीने विकास होईल. सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. आभार प्रदर्शन बंडू हर्णे यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्षा कै. सायली मालंडकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.











