मालवण येथे 8 फेब्रुवारी रोजी ‘सिंधुदुर्ग श्री’ जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन !

मसूरे (प्रतिनिधी) : बेस्ट शिव-हनुमान मंदिर ट्रस्ट सांताक्रुज मुंबई व बेस्ट शिव-हनुमान व्यायामशाळा कांदळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने दरवर्षी घेण्यात येणारी जिल्ह्यातील मानाची समजली जाणारी २४ वी जिल्हास्तरीय ‘सिंधुदुर्ग श्री’ ही शरीर सौष्ठव स्पर्धा यावर्षी शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ रोजी मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन कुडाळ मालवणचे आमदार श्री निलेश राणे यांच्या शुभहस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मालवण नगर परिषदेचे मुख्याधिकारी माननीय संतोष जिरगे उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेतील पारितोषिके पुढीलप्रमाणे आहेत. स्पर्धेचा मानकरी सिंधुदुर्ग श्री रोख रुपये २१०००/- स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्रक व जरतरी मानपट्टा. ५०,५५,६०,६५, आणि ७० वर्षावरील प्रत्येक वजनी गटातील पहिल्या पाच विजेत्यांना अनुक्रमे ३५००/-, ३०००/-, २५००/-, २०००/-, १५००/- रोख व प्रशस्तीपत्रक. बेस्ट पोझर रोख रुपये ४०००/- व प्रशस्तीपत्रक, बेस्ट इम्प्रुड रोख रुपये ४०००/- व प्रशस्तीपत्रक.

याप्रमाणे आकर्षक पारितोषिके मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व शरीर सौष्ठवपटूंनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा. प्रत्येक स्पर्धकाने स्पर्धेस येते वेळी आपले मूळ आधार कार्ड सोबत घेऊन यावे. याप्रसंगी क्रीडा प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बेस्ट शिव-हनुमान मंदिर ट्रस्ट, सांताक्रुज, मुंबईचे अध्यक्ष नंदकुमार राणे, बेस्ट शिव-हनुमान व्यायामशाळा,कांदळगावचे अध्यक्ष उमेश कोदे, सचिव प्रवीण पारकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!