उपसरपंच दिपक सुर्वे यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण
आचरा (प्रतिनिधी) : देशाचा ७६ वा प्रजासत्ताक दिन चिंदर ग्रामपंचायतीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उपसरपंच दिपक सुर्वे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत, ध्वजगीत म्हटल्यानंतर शिक्षक निशिगंधा वझे यांनी संविधानाची शपथ तर आरोग्य सेविका सरीता जंगले यांनी कुष्ठरोग व क्षयरोग या विषयी यावेळी शपथ घेण्यात आल्या. चिंदर भटवाडी जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी यावेळी समुहगीत व भगवती माऊली मंदिर ते ग्रामपंचायत अशी प्रभात फेरी काढण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत अधिकारी मंगेश साळसकर, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नाटेकर, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, कृषी सहाय्यक विवेक खांडेकर, तलाठी संतोष जाधव, डॉ. विवेक घाडगे, पोलिस पाटील मंगेश नाटेकर, निशिगंधा वझे, दिगंबर जाधव, कविद्र माळगांवकर, सिध्देश नाटेकर, रोशनी फर्नांडिस, रोहित पाटील, समिर अपराज, रणजित दत्तदास, पिंट्या दळवी, महेंद्र कदम, अमृता तोरसोळकर, साधना पाताडे, नंदिनी पावसकर, विनिता मसुरकर, सुनंदा अपराज, अश्विनी पाताडे, अक्षय साटम विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.
