सोनवडे घाटमार्ग व आंजीवडे घाटमार्गा संदर्भात महत्वाची भेट
ओराेस (प्रतिनिधी) : कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आज महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीत बहुचर्चित असलेल्या घोटगे-शिवडाव-सोनवडे घाटमार्गाच काम लवकरात लवकर सुरू व्हावे या बाबत सकारात्मक चर्चा झाली. सोबतच प्रस्तावित आंजीवडे घाटमार्गाचा DPR बनविण्याची कार्यवाही करण्यासंदर्भात देखिल चर्चा झाल्याची माहिती आमदार निलेश राणे यांनी ‘एक्स’वरून दिली आहे.
यात निलेश राणे यांनी कुडाळ मालवणचा बॅकलॉक मोठा आहे, या बाबत सन्मा. बांधकाम मंत्री यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी सकारात्मक आश्वासन दिले त्या बद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार अश्या आशयाची ‘एक्स’ पोस्ट केली आहे.