नांदगाव (प्रतिनिधी) : असलदे दिवाणसानेवाडी ग्रामस्थ मंडळ प्रतिवर्षाप्रमाणे शनिवार दि. ०१/०२/२०२५ रोजी माघी गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी ७ वा. अभिषेक सकाळी ९ वा. गणेश पुजन सकाळी १० वा. श्री सत्यनारायण महापूजा दु. १२.३० वा. महाआरती दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद दुपारी ३ ते ५ वा. हळदी कुंकू समारंभ रात्रौ ८ वा. संगीत भजन व रात्रौ ९.३० वा. बुवा मोहन वारंग ब्राम्हणदेव प्रासा, भजन मंडळ, दहीसर (पुर्व) नेरूर-कुडाळ गुरुवर्य : बुवा विनोद चव्हाण आणि बुवा दिनेश शिवाजी बाणे श्री ब्रम्हदेव प्रासा. भजन मंडळ, कोर्ले (मुंबई, दिवा-ठाणे) गुरुवर्य : बुवा श्रीधर मुणगेकर यांचा २० x २० डबलबारी भजनांचा जंगी सामना अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी व गणेश भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन असलदे दिवाणसानेवाडी ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
![](https://aplasindhudurg.in/wp-content/uploads/2025/01/WhatsApp-Image-2025-01-30-at-2.08.12-PM.jpeg)