फोंडाघाट (प्रतिनिधी) : सह्याद्रीच्या निसर्गरम्य परिसरात, भात शेतीच्या खाचरांच्या सानिध्यात वसलेल्या, मोरया गोसावी च्या , फोंडा -गडगेसकल वाडीवरील श्री गणपती मंदिरामध्ये समस्त ग्रामस्थांचे वतीने माघी गणेश जयंती उत्सव साजरा होणार आहे. या निमित्ताने सकाळी नऊ वाजता अभिषेक पूजाअर्चा, बारा वाजेपर्यंत भाविकांचे सुश्राव्य भजन, दुपारी बारा वाजता गणेश जन्म, महाआरती आणि महाप्रसाद, दुपारी तीन वाजता महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी सात वाजता किर्तन, आठ वाजता दशावतारी नाट्य प्रयोग, तसेच रविवार तारीख दोन फेब्रुवारी रोजी कबड्डीचे प्रदर्शनीय सामने असे उपक्रम आयोजित केले आहेत.तरी पंचक्रोशीतील समस्त भाविकांनी सहकुटुंब उपस्थित राहून दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष श्री गणेश मंदिर यांचे कडून करण्यात आले आहे.
फोंडाघाट गडगेसकल येथे माघी गणेश जयंती उत्सव शनिवार 1 फेब्रुवारी रोजी !
