वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने ३७ वा व्यापारी एकता मेळावा ३१ जानेवारी २०२५ रोजी वैभववाडी तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत अर्जुन रावराणे विद्यालयाच्या पटांगणावर संपन्न होणार आहे. या मेळाव्याला खासदार नारायण राणे, महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री पालकमंत्री ना. नितेश राणे उपस्थित राहणार आहेत.
३१ जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता दत्त मंदिर वैभववाडी ते अ रा विद्यालय वैभववाडी अशी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सकाळी ठीक १०:३० वाजता व्यापारी एकता मेळाव्याचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध कवी व प्रेरणादायी वक्ते म्हणून प्रसाद कुलकर्णी यांचे यशस्वी होण्याचा मार्ग या विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन होणार आहे.
वैभववाडी तालुका व्यापारी संघाच्या वतीने यावर्षीच्या व्यापारी एकता मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असून तयारी पूर्ण होत आली आहे. या व्यापारी एकता मेळाव्यात खासदार नारायण राणे व कॅबिनेट मंत्री, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा व्यापारी संघटनेच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
![](https://aplasindhudurg.in/wp-content/uploads/2025/01/WhatsApp-Image-2025-01-30-at-1.05.46-PM-1024x571.jpeg)
![](https://aplasindhudurg.in/wp-content/uploads/2025/01/WhatsApp-Image-2025-01-30-at-1.05.47-PM-768x1024.jpeg)
![](https://aplasindhudurg.in/wp-content/uploads/2025/01/WhatsApp-Image-2025-01-30-at-1.54.10-PM-1024x996.jpeg)
![](https://aplasindhudurg.in/wp-content/uploads/2025/01/WhatsApp-Image-2025-01-30-at-1.54.10-PM-1-1024x577.jpeg)
![](https://aplasindhudurg.in/wp-content/uploads/2025/01/WhatsApp-Image-2025-01-30-at-1.54.11-PM.jpeg)