फोंडाघाट (प्रतिनिधी) : गेली दोन-तीन वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा-काजू बागायतदारांना त्यांच्या बागेमध्ये, मोहर-फळधारणे वेळी कीटकांच्या प्रादुर्भावाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होऊन त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनातर्फे कृषी विभाग- कणकवली कडून फोंडाघाट परिसरातील बागायतदारांना मोफत कीटकनाशक पिंजऱ्याचे व औषधाचे वाटप नुकतेच फोंडाघाट ग्रामपंचायत येथे, ग्राम विस्तार अधिकारी अनिल जाधव आणि कृषी सहाय्यक अक्षया परब यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी बागायतदार कमलाकर महाजन, आत्माराम येरम, श्रीनिवास नाडकर्णी ,हर्षद केळुसकर, अनंत तेली ,राजेश शिरोडकर, भाई तावडे आणि शेतकरी उपस्थित होते.यावेळी अक्षया परब यांनी कीटकनाशक पिंजऱ्याची जोडणी, प्रात्यक्षिक दाखवून माहिती दिली.
फोंडाघाट – ग्रामपंचायत येथे बागायतदार शेतकऱ्यांना कीटकनाशक पिंजऱ्याचे वाटप !
