धार्मिक कार्यक्रमांसह लकी ड्राॅ,जिल्हास्तरीय रेकाॅर्ड डान्स स्पर्धेचे आयाेजन
कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई गाेवा महामार्गापासुन हाकेच्या अंतरावरील असलेले कलमठ गावडेवाडी येथील श्री गणेश मंदिराचा वर्धापन दिन व माघी गणेश जयंती उत्सव दि. 31 जानेवारी व शनिवार 1 फेब्रुवारी राेजी संपन्न हाेणार आहे.त्यानिमत्त धार्मिक, सांस्कृतीक,सामाजिक कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे.
शुक्रवार सायंकाळी 4 वा.ढाेल ताशांच्या गजरात उत्सवमुर्तीची मिरवणूक निघणार आहे. शनिवारी सकाळी 6 वा.काकड आरती,सकाळी 9 वा.गणेश पुजन, सकाळी 10 वा.श्री सत्यनारायणाची महापुजा,दुपारी 12 वा.महाआरती,दुपारी 1 ते 3 महाप्रसाद,सायंकाळी 4 ते 6 महिलांचे फनीगेम्स त्यानंतर 6 वा.पासुन निमंत्रित भजने,सायंकाळी 7 वा.स्थानिकांचा सत्कार समारंभ, रात्री 9 ते 10 वा.लकी ड्राॅ स्पर्धेची साेडत, रात्री 10 नंतर जिल्हास्तरीय भव्य खुल्या साेलाे रेकाॅर्ड डान्स स्पर्धा हाेणार आहेत.
भाविकांनी तिर्थप्रसाद,महाप्रसाद व आयाेजित कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन गायत्री ब्राम्हण जेष्ठ मंडळ वा गायत्री युवा प्रतिष्ठान कलमठ-गावडेवाडी यांनी केले आहे..

