६ फेब्रुवारी पूर्वी अखर्चित निधी जास्तीतजास्त खर्च केला जाईल

१ एप्रिल २०२५ नंतर जिल्हा प्रशासनात आर्थिक आणि कामकाजाची वेगळी शिस्त दिसेल

जिल्हा नियोजन समिती सभेनंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली ग्वाही

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पालकमंत्री म्हणून आपल्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या पहिल्या जिल्हा नियोजन सभेत खा. नारायण राणे यांच्यासह अन्य सदस्यांनी केलेल्या सूचनांप्रमाणे जिल्हा प्रशासनाच्या कारभारात नजीकच्या काळात बदल दिसेल. ६ फेब्रुवारी पूर्वी अखर्चित निधी जास्तीतजास्त खर्च केला जाईल. तसेच १ एप्रिल २०२५ नंतर जिल्हा प्रशासनात आर्थिक आणि कामकाजाची वेगळी शिस्त दिसेल, अशी ग्वाही जिल्हा नियोजन समिती सभेनंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.

जिल्हा नियोजन सभा संपल्यानंतर पालकमंत्री राणे यांनी जिल्हाधिकारी बैठक सभागृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी आ दीपक केसरकर, वेंगुर्ला माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना ना राणे यांनी, जिल्हा नियोजनाच्या प्रत्येक पैशावर जनतेचा अधिकार आहे. जनतेला हिशोब आम्हाला द्यावा लागतो. २०२५-२६ साठी ४०० कोटी खर्चाचा प्रारूप आराखडा तयार केला असलातरी २०२४-२५ या वर्षातील शिल्लक निधी ६ फेब्रुवारी पूर्वी खर्च करण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना आर्थिक शिस्त लावण्याला माझे प्राधान्य राहणार आहे. किती निधी आणला यापेक्षा किती निधी खर्च केला, याला जास्त महत्त्व आहे, असे सांगितले.

error: Content is protected !!